जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राज्यव्यापी अधिवेशन संपन्न, पदाधिकारींना पैठणी व विमा चे वाटप
नासिक
जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पहिले राज्य व्यापी अधिवेशन नासिक येथिल निसर्ग रम्य वातावरण असणार्या गरुडझेप अँकाडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या वेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांना अपघाती विमा योजना, पत्रकार बांधवांच्या पत्नी साठी पैठणी साडी व आकर्षक भेट वस्तू प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यकमाचा अध्यक्षस्थानी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नासिक ग्रामिण पोलीस दलाचे पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले, दै महासागर चे संपादक जेष्ठ पत्रकार प्रा जयंत महाजन, जागर जनस्थान चे मुख्य संपादक समिर चव्हाण, माजी नगरसेवक दिनकर आण्णा पाटील, दै महासागर चे कार्यकारी संपादक सुधीर उमराळकर, माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सावंत,अल्पसंख्यांक सेलचे तन्वीर तांबोळी, गुड्डू सय्यद यांच्या सह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, राष्ट्रीय सल्लागार अन्वर पठाण, विश्वस्त मंगेश भामरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष अकिल पटेल, नासिक जिल्हा महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्ष वृषाली साळुंकी, नासिक शहर अध्यक्ष शोहेब शेख यांच्या सह पोलीस मित्र समिती चे राज्य अध्यक्ष आनंद दाणी, दिव्यांग सेवा समिती चे राज्य अध्यक्ष सुकदेव खुर्दळ, अन्याय अत्याचार निवारण समिती चे राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे, अन्याय अत्याचार निवारण समिती चे राज्य उपाध्यक्ष करुना पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते
दिप प्रज्वलनाने कार्यकमाची सुरवात करण्यात आली तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा जयवंत महाजन यांचे पत्रकारिता काल आज आणी उद्या या विषयावर व्याख्यान झाले तर वासुदेव देसले व समिर चव्हाण यांनी पत्रकारिता कशी निर्भीड करावी या विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक पदाधिकारी यांना अपघाती विमा, भेटवस्तू व त्यांच्या पत्नी साठि पैठणी साडीचे वाटप करण्यात आले
या वेळी यवतमाळ, अकोला, पुणे, अहिल्यानगर, नासिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ातील पदाधिकारी तसेच सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, नासिक शहर येथिल पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते
कार्यकमाचे यशस्वी नियोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नासिक जिल्हा व नासिक शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले


Post a Comment
0 Comments