Type Here to Get Search Results !

तरुणांनो भरतीची तयारी करताय? आपल्यासाठी खुश खबर


 तरुणांनो भरतीची तयारी करताय? आपल्यासाठी खुश खबर

मुंबई प्रतिनिधी 

महाराष्ट्रभरात जे तरुणतरुणी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी लवकरच वनविभागाद्वारे वनरक्षक पदांसह इतर पदाची मेगा भरती होणार असल्याची माहिती वनखात्यातील विश्वासनीय सूत्रांकडून दिली जात आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा गृह विभागात पोलीस भरती सह लवकरच वनविभागाची भरती देखील होणार असल्याने भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून परीक्षार्थी कसून तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी या दोन मुख्य टप्प्यात होणार आहे.

 वनविभागात 12 हजारपेक्षा जास्त पदांची भरती 

नाशिक 887                          छ.संभाजीनगर 1535

नागपूर 1852.                       चंद्रपूर  845

गडचिरोली 1423.                 अमरावती  1188

यवतमाळ  665                     पूणे  811

कोल्हापूर  1286                   धुळे 931

ठाणे 1568                           राज्यातील एकूण जागा  12991


10वी 12वी पास विद्यार्थ्यांना संधी 

दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असून यामध्ये प्रामुख्याने वनरक्षक,शिपाई,मदतनीस,सफाई कामगार,प्रिंटर ऑपरेटर,रखवालदार या पदाचा समावेश असून लवकरच ऑनलाईन अर्ज वनविभागाच्या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments