Type Here to Get Search Results !

दारू पिण्याच्या वादातून तरुणाचा खून

दारू पिण्याच्या वादातून तरुणाचा खून

८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.परिसरात दहशतीचे वातावरण

नाशिक प्रतिनिधी

  इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवलेणी परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. रामदास नारायण बोराडे (वय 20) या तरुणाचा जागीच


मृत्यू झाला असून, त्याचा मित्र राजेश बोराडे (वय 20) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साहिल राजन सिंग (वय 20, रा. सिडको, अंबड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 13 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजता ते 11.30 वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी व त्याचे मित्र ज्ञानपीठ सोसायटीसमोर उभे असताना आरोपी शौकत शेख, नौशाद सय्यद, नफीस उर्फ नफ्या, विजय माळेकर, प्रिन्स उर्फ पियुष पालवे, रोहित पालवे, नितीन घुगे, राहुल कुंभार आणि त्यांचे काही अनोळखी साथीदार यांनी या तिघांवर अचानक हल्ला चढवला.दरम्यान, राजेश आणि आरोपींमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. हे भांडण वाढल्याने आरोपींनी मिळून शस्त्रांनी हल्ला केला. शौकत शेख याने 'इन मादरचोत को छोडो मत, मार डालो' अशी दमबाजी करत विजय माळेकरला हल्ल्याचा इशारा दिला. त्यानंतर विजयने रामदास बोराडेच्या कंबरेवर सुऱ्याने वार करून त्याचा खून केला. याचप्रमाणे शौकत आणि रोहित यांनी सुऱ्याने राजेशवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.यावेळी आरोपी नफ्या आणि नितीन घुगे यांनी तलवारी फिरवत परिसरात दहशत निर्माण केली, तर नितीनने तेथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. प्रिन्स पालवे याने काचेची बाटली फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारून जखमी केले. तसेच नौशाद आणि राहुल कुंभार यांनी फिर्यादी व इतरांना मारहाण केली.या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला असून, त्यांच्यावर विविध कलमांसह हत्यार कायदा, फौजदारी सुधारणा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा १४ एप्रिल रोजी पहाटे नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सपोनी अंकोलीकर करीत आहेत. याप्रकरणी काही आरोपी अल्पवयीन असून, त्यांच्या पार्श्वभूमीचीही चौकशी सुरू आहे. पोलीस लवकरच सर्व आरोपींना अटक करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments