Type Here to Get Search Results !

कलाशिक्षक संजय जगताप यांनी रांगोळीतून साकारले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 कलाशिक्षक संजय जगताप यांनी रांगोळीतून साकारले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

नाशिक प्रतिनिधी

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथील कलाशिक्षक संजय जगताप यांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ फूट बाय ६ फुट अशा सप्तरंगी रांगोळीच्या चित्रातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना साकारले. सुमारे चार ते पाच तासाच्या अथक परिश्रमातून बाबासाहेबांवर असलेली निष्ठा आणि नितीन श्रद्धेपोटी कलाशिक्षक श्री संजय जगताप यांनी भव्य अशी रांगोळी साकारलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिलेली आहे. विद्यार्थ्यांना देशासाठी केलेल्या महापुरुषांच्या अनोख्या कार्याची माहिती होणे आणि त्यांना देखील या चित्रातून कलेची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने हे रांगोळी चित्र साकारले असल्याचे कलाशिक्षक जगताप म्हणाले. त्यांच्या या कलाविष्काराबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुजाता शिंदे, पर्यवेक्षक धनंजय देवरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.


Tags

Post a Comment

0 Comments