सांगली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य डिजिटल मीडिया अधिवेशनाचे आयोजन एस. बी. आय. कॉलेज, सांगली येथे करण्यात आले. या अधिवेशनाचे विशेष आकर्षण ठरले ते राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांचा करण्यात आलेला भव्य सत्कार!
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान खोबऱ्याचा हार, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून करण्यात आले तसेच या गौरव सोहळ्याचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी डिजिटल माध्यमांच्या वर्तमान व भविष्यकालीन वाटचालीवर भाष्य करत पत्रकारांच्या कार्याची प्रशंसा केली.
सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास राज्य सरचिटणीस व दैनिक ‘समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, निवड समिती अध्यक्ष रुपेश पाडमुख, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरटे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना देखील शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, पत्रकार संघाचे प्रवक्ते रमेश डोंगरे, अहील्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, सांगली जिल्हाध्यक्ष प्रताप मिटकरी, श्रीनिवास शिंदे, संजय फुलसुंदर, बाबाजी वाघमारे, नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहन पवार, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वामी राज गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार व संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजिटल युगातील पत्रकारितेचे महत्त्व:
अधिवेशनात डिजिटल मीडिया आव्हाने आणि संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डिजिटल पत्रकारितेची वाढती भूमिका, खोट्या बातम्यांचा प्रसार, सोशल मीडियातील जबाबदारी, तसेच नव्या पिढीतील पत्रकारांची दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली
उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, डिजिटल मीडियामुळे बातम्या झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, मात्र त्याचवेळी पत्रकारांनी सत्यतेची पडताळणी करूनच बातम्या सादर केल्या पाहिजेत. पत्रकार संघटनांनी यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

Post a Comment
0 Comments