Type Here to Get Search Results !

अमरावतीचा भूमीपुत्र बनणार भारताचा सरन्यायाधीश

अमरावती चा भूमीपुत्र बनणार भारताचा सरन्यायाधीश 

भूषण गवई घेणार सरन्यायाधीश म्हणून शपथ 


भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बी आर गवई 52 वे सरन्यायाधीश होणार असून विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची नुकतीच शिफारस केली आहे 

24 मे 2019 पासून न्यायमूर्ती बी  आर गवई सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिने त्यांचा कार्यकाळ असेल 13 नोव्हेंबर 2025 ते निवृत्त होतील न्यायमूर्ती गवई हे भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित असतील यापूर्वी 2007 मध्ये दलित न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे देशाचे सरन्यायाधीश झाले होते 

न्यायमूर्ती बी आर गवई हे मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील असून मुंबई नागपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या क्षेत्रात काम केले आहे त्यानंतर नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी येथे न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी काम सांभाळले असून भूषण गवई हे भारतीय रिपब्लिक पक्षाचे दिवंगत नेते माजी राज्यपाल रा सू गवई यांचे पुत्र आहेत.

Post a Comment

0 Comments