दिल्ली येथे राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेचे आयोजन
महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन मार्फत दिली
नाशिक प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय प्लंबिंग परिषद व आधुनिक साहित्य प्रदर्शन भरवण्यात येणार असून यात महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे या मंडळाचे नेतृत्व विदर्भ प्रमुख जीवन राजूरकर हे करणार असून त्यांची असोसिएशनच्या वतीने निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथील परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लंबिंग क्षेत्रात काम करणारे तज्ञ जल बचत, ऊर्जा बचत, या विषयावर शोध निबंध सादरीकरण करणार आहे.महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक उत्पादन आघाडीवर असलेले राज्य आहे येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक, व्यवसायिक,विमानतळ, बंदर, रेल्वे, मेट्रो व महामार्ग विस्ताराचे प्रकल्प उभारणी वेगात सुरू आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या तालुक्याचे शहरीक
रण वेगाने होते आहे. विकासाची गती बघता मुंबई पासून नागपूर, कोल्हापूर संभाजीनगर पर्यंत सर्व शहरातील इमारतीची उंची लवकरच 150 मीटर असेल.भविष्यात या शहरात निर्माण होणार्या उंच इमारतीमध्ये उत्तम दर्जाचे प्लंबिंग काम व्हावे.या उद्देशाने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे यंदा शहरातील प्लंबिंग ठेकेदार कैलास डोंबे, राहुल पाटील, वैभव जोशी यांना प्रतिनिधी मंडळात ही संधी देण्यात आली आहे असे असोसिएशनचे राज्य चेअरमन रवि पाटील यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments