आई-वडिलांना कधी विसरू नका वसंत हंकारे
नागपूर प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस आयपीएस अधिकारी व्हा परंतु आई-वडिलांना कधीच विसरू नका असे प्रतिपादन गरुड झेप अकॅडमी आयोजित मार्गदर्शन शिबिरा वेळी व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रभरा मध्ये नावलौकिक असलेल्या लोणारा बोखारा रोड येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये दि.14 रविवार रोजी विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्याते वसंत हंकारे यांचा प्रबोधन पर पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी वसंत हंकारे म्हणाले की आनंदी आयुष्य जगण्यासाठी स्वतःला खुश ठेवण्यासाठी मानसिक समाधान गरजेचे असून या समाधानातूनच यश प्राप्ती चा मार्ग मिळतो यश प्राप्त होऊन आपण कितीही मोठे अधिकारी प्रशासक बनलो तरीही जन्मदेत्या आई-वडिलांना कधी विसरू नका त्यांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट हे अमूल्य आहे त्याचे मोल न करता शेवटपर्यंत आई-वडिलांना जपा ही आपल्या आयुष्यात आपण कमावलेली शिदोरी आहे यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिस अहेमद,गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्रा डॉ एस एस सोनवणे,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबा शेरे,जेष्ट समाजसेवक राजा माहूरे,ललिता सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments