भाजपा दिव्यांग आघाडीच्यावतीने पुरस्काराचे आयोजन
ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांना जीवनगौरव तर बाळासाहेब सोनवणेंना दिव्यांगरत्न व समाजभूषण
नाशिक प्रतिनिधी
भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने रविवार दि. १९ रोजी सकाळी ११ वा. प्रबोधनकार ठाकरे सभागृह,नवीन सिडको येथे दीपावलीनिमित्त दिव्यांग बांधवांना फराळ वाटप आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांना जीवनगौरव पुरस्कार. तर दिव्यांगांचे पुनर्वसन करणारे तसेच महिरावणी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील विद्यालयाचे आदर्श उपक्रमशील उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांना दिव्यांगरत्न व समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी अनिल नहार, डॉ.अश्विन पारखे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, शिल्पा झारेकर, राजाराम वाघ, सोनाली ठाकरे, अनिता भामरे, एडवोकेट नितीन पाटील, ललित पवार, योगेश मोरे, सचिन अग्रवाल, बाबूजी गुप्ता यांना समाजभूषण तर राजेंद्र शेळके, आकाश पगार, सतीश नांदोडे, गणेश ढेमसे, लक्ष्मण डोळस विलास पाटील या पत्रकारांना "पत्रकार भूषण" या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारार्थींचा मानाचा फेटा,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी,आमदार सिमाताई हिरे, उद्योगपती बुधाजी पानसरे,भाजपा अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड आदी प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांची दिपावाली द्विगुणीत करावी असे आवाहन बाळासाहेब घुगे आणि यमुनाताई बाळासाहेब घुगे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments