नाशिककरांनो सुज्ञ बना स्वच्छतादूत चंदू पाटील यांचे आवाहन
नाशिक प्रतिनिधी
उत्तम व निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची असून प्रशासनासोबत नागरिकांची देखील जबाबदारी ही स्वच्छता बाबतीतील नियम पाळण्याची आहे. यासाठी नाशिककरांनी वेळीच सुज्ञ व्हावे असे भावनिक आवाहन स्वच्छतादूत चंदू पाटील यांनी केले.
गेली अनेक वर्षापासून पर्यावरण प्रेमी स्वच्छतादूत चंदू पाटील हे नाशिक मधील विविध भागात नदी परिसरात स्वच्छतेचे काम करत असून नुकतेच सातपूर भागात त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली यावेळी त्यांनी भावनिक होऊन नाशिककरांना आवाहन केले की देवी देवतांचे फोटो घरातील मंदिर हे कचऱ्यामध्ये न फेकता एका जागी संकलित करा तसेच कचरा नदी नाल्यात न फेकता तो महापालिकेच्या घंटागाडीत द्या जेणेकरून उत्तम आरोग्य सर्व नाशिककरांना लाभेल. पाटील यांच्या अविरतपणे सुरू असलेल्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात घेतली होती नाशिकचे नाव देश पातळीला येणाऱ्या या स्वच्छतादुताच्या या अवाहनाला नाशिककर नक्कीच साथ देतील अशी अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments